`टिळक-रंगारी` वादावर राज ठाकरेंनी दिली ही प्रतिक्रीया
सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण ? राज्यभरात सध्या जोरदार वादावादी सुरु आहे. ‘लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी या दोघांचे नाव घेऊन हे वाद सुरु आहेत.
पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण ? राज्यभरात सध्या जोरदार वादावादी सुरु आहे. ‘लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी या दोघांचे नाव घेऊन हे वाद सुरु आहेत.
याप्रकरणावर आतापर्यंत अनेक राजकिय मंडळींनी भाष्य केले. पण आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या प्रकरणी आपली प्रतिक्रीया दिली आहे.
यासंदर्भात राज ठाकरे यांना विचारले असता, हे वाद म्हणजे मूर्खपणा असल्याची टिपण्णी त्यांनी केली. शहरात मनसेच्या विधानसभा मतदारसंघांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी दोन दिवस त्यांनी संवाद साधला.
या वेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी हे विधान केले.
'टिळक' आणि 'रंगारी' यांच्या नावावरून सुरू असलेला वाद म्हणजे मूर्खपणा आहे. गणेशोत्सवातील टिळकांचे योगदान विसरता येणार नाही,’ या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वादावर भाष्य केले आहे.
निवडणुकांमधील पराभवानंतर मनसे राज्यभरात सक्रिय झाली आहे. राज ठाकरे स्वत: प्रत्यक्ष जाऊन पदाधिकाऱ्यांशी बातचित करत आहेत. शहरातील परिस्थिती जाणून घेऊन नव्या पदाधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येईल, असे ठाकरे यांनी यावेळी सूचित केले.