मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण जवळील तिवरे धरण फुटून सात दिवस झाले तरी अजूनही एडीआरएफ पथकाची शोध मोहीम सुरु आहे. आतापर्यंत २० मृतदेह हाती लागले आहेत. तर तीन जण बेपत्ता आहेत. दरम्यान, एक जण जीवंत सापला. दरम्यान, तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. तसेच तिवरे धरण फुटले कसे याची पहाणी करून येथील ग्रामस्थांशी चर्चा देखील केली. त्याचबरोबर राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देखील करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING




पवार यांनी तिवरे धरणग्रस्तांच्या भेटीनंतर तिवरे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नसल्याचे सांगितले. तसेच राज्य आणि केंद्र सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून दुर्घटना किती भीषण याची माहिती केंद्र सरकारला देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.



राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर फंडातून तिवरे धरण अपघातग्रस्थ प्रत्येक कुटुंबाला १ लाख रुपयांची मदत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे शेखर निकम यांच्या हस्ते देण्यात आली.