Thane Mahanagarpalika Bharti 2023: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ठाणे महानगरपालिकेकडून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील परिचारिका पदाच्या रिक्त जागांसाठी नवीन भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अतंर्गत 72 जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे महानगरपालिकेत काम करण्याची उत्तम संधी चालून आली आहे. 29 ऑगस्ट रोजी 2023 उमेदवारांची मुलाखत होणार आहे. उमेदवारांना कै. कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. मुलाखतीसाठी उमेदवारांना काही आवश्यक कागदपत्रे घेऊन येणे बंधनकारक असणार आहे. 29 ऑगस्ट रोजी थेट मुलाखती होणार आहेत. 


ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील 'परिचारीका' (Nurse) या पदासाठी 72 पदे भरण्यात येणार आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने सहा महिन्याच्या कालावधीसाठी (179 दिवस) असणार आहे. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. 


यांना असेल प्रथम प्राधान्य


एकूण 72 रिक्त पदासांठी शैक्षणिक पात्रता ही १२वी पास त्याचबरोबर GNM किंवा B.Sc (नर्सिंग) पूर्ण केलेले असावे. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात तसेच कोव्हिड १९ कोलावधीमध्ये ठाणे महानगरपालिकेकडे परिचारिका म्हणून सेवा दिलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य असणार आहे. 


कोणती कागदपत्रे लागणार 


दहावी व बारावीचे प्रमाणपत्रे, जीएनएनची पदविका, बी.एस्सी (नर्सिंग) असल्यास प्राधान्य, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक, किमान तीन वर्षांचा अनुभव, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक


वयोमर्यादा व पगार किती असेल


परिचारिका पदासाठी ठाणे महनगरपालिकेकडून 30 हजार रुपये दरमहा मानधन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर, खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 45 वर्षे वयाची अट आहे. 


मुलाखतीची सुरवात – २९ ऑगस्ट २०२३ सकाळी ११ वाजता.


मुलाखतीचा शेवट – २९ ऑगस्ट २०२३ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत.


अधिकृत बेवसाईट – https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html


भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1VMErO8gnyRDCyaC6eWauotUrNh9dBLCB/view) या लिंकवर क्लिक करा