Today Petrol Diesel Price on 3 January 2024 : तुम्ही जर वाहन चालवत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. दरम्यान आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केला जाऊ  शकतो, असे संकेत केंद्र सरकारकडून दिले जात आहेत. तरी अद्याप याबाबत अधिकृत कोणतीही घोषणा केली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत घट आणि क्रूड ऑइलची किंमत 80 डॉलरच्या खाली राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सुधारणा केली जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानुसार तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले असून, आज 3 जानेवारीलाही पेट्रोल आणि डिझेल  दरांत कोणताही बदल नाही. 22 मे 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल आले नाहीत. पुढील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल करू, असे संकेत सरकारकडून दिले जात आहेत. तरीही अजून काही घोषणा करण्यात आली नाही. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्यात आलेला नाही, मात्र काही राज्यांनी काही काळापूर्वी व्हॅटी वाढवून पेट्रोल डिझेलचे दर वाढवले होते. या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यांचा समावेश आहे.


महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर


- मुंबईत पेट्रोल 16.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर


- पुण्यात पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर 


- ठाण्यात पेट्रोल 105.97 आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर 


- नाशिकमध्ये पेट्रोल 105.89 रुपये आणि डिझेल 92.42 रुपये प्रति लिटर 


- नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर


- कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.47 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर 


हे सुद्धा वाचा:  22 जानेवारी ड्राय डे! मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा; या दिवशी मांसमच्छीही मिळणार नाही


इतर शहरांमधील पेट्रोल डिझेलचे दर 


- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये तर डिझेल प्रति 90.27 रुपये 


- कोलकत्ता मध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर तर डिझेल 92.76 प्रति लिटर 


- चैन्नईमध्ये  पेट्रोल 106.31 रुपये प्रति खर्च तर डिझेल 94.24 रुपये प्रति खर्च


तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर 


तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घरबरसल्या जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तेल विपणन कंपन्यांच्या वेबसाइटवर भेट देऊ शकता किंवा एसएमएस पाठवू शकता. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल, तर तुम्ही 9224992249 वर RSP नंतर शहर कोड लिहून पाठवा. तसेच जर तुम्ही BPCL ग्राहक असल्यास  RSP लिहिल्यास 9223112222 वर एसएमएस पाठवू शकता.