Today Petrol Diesel Price: पेट्रोलच्या किंमती कमी-जास्त झाल्या तर आपल्या दैनंदिन आयुष्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. वाहन हे आपल्या रोजच्या आयुष्यातील निगडीत एक भाग आहे. अनेक घरांमध्ये एक तरी वाहन आहे. तसेच भाजीपाला आणि तत्सम वस्तू या वाहनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्यावर इतर वस्तुंच्या किंमतीवरही त्याचा परिणाम होतो. म्हणून पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर राहाव्यात किंबहुना कमी व्हाव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत असतात. दरम्यान आज मुंबईसह राज्यभरातील पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत आज पेट्रोल 106 रुपये तर डिझेल 94.27 रुपये लिटर मिळत आहे. पुण्यात पेट्रोल 106.17 तर डिझेल 92.68 रुपये लिटर, पालघरमध्ये पेट्रोल 106.62 तर डिझेल 93.09 रुपये लिटर आहे. रायगडमध्ये पेट्रोल 105.89 तर डिझेल 92.39 रुपये लिटर, रत्नागिरीमध्ये पेट्रोल 107.43 तर डिझेल 93.87रुपये लिटर मिळत आहे. 


ठाण्यामध्ये पेट्रोल 106.01 तर डिझेल  92.50 रुपये, नाशिकमध्ये पेट्रोल 106.76 तर डिझेल 93.26 रुपये, सांगलीमध्ये पेट्रोल 106.31 रुपये तर  92.85 रुपये लीटर, 
सातारामध्ये पेट्रोल 106.61 रुपये तर डिझेल 93.13 रुपये आणि सिंधुदुर्गमध्ये पेट्रोल 108.01 तर डिझेल 94.48 रुपये लिटर मिळत आहे. 


अहमदनगरमध्ये पेट्रोल 106.21 तर डिझेल 92.73, अकोल्यात पेट्रोल 106.14 तर डिझेल 92.69, अमरावतीत पेट्रोल 107.14 तर डिझेल 93.65, औरंगाबादमध्ये पेट्रोल 108.00 तर डिझेल 95.96, भंडारामध्ये पेट्रोल 107.01 तर डिझेल 93.53


राज्यातील विविध शहरांतील पेट्रोलचे दर पुढीलप्रमाणे 


बीड 107.90 
बुलढाणा 106.82 
चंद्रपुर 106.17 
धुले 106.02 
गढ़चिरौली 107.26 
गोंदिया 107.56 
हिंगोली 107.06 
जलगांव 107.64 
जालना 107.70 
कोल्हापुर 106.56 
लातूर 107.38 
नागपुर 106.04 
नांदेड़ 107.89 9
नंदुरबार 107.03 
उस्मानाबाद 107.35 
परभणी 109.47 
सोलापुर 106.20 92.74
वर्धा 106.58 93.11
वाशिम 106.95 93.47
यवतमाल 107.45 93.95


ओपेक प्लस देशांनी घेतला निर्णय


OPEC आणि सहकार्य देश (OPEC Plus), पेट्रोलियम उत्पादक देशांची संघटना, कच्च्या तेलाच्या (पेट्रोल डिझेलच्या किंमती) कमी झालेल्या किमतींना गती देण्यासाठी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या देशांनी पुढील वर्षापर्यंत उत्पादनात कपात सुरू ठेवण्याचे मान्य केले आहे. सुरुवातीला रशियाला हा निर्णय मान्य नव्हता पण नंतर त्यानेही या निर्णयाला संमती दिली. त्याचबरोबर अमेरिकेसह पाश्चात्य देश तेल उत्पादन वाढवण्याची मागणी ओपेक देशांकडे करत आहेत.


मोबाइलवर पाहा दर


आता पेट्रोल डिझेलचे दर तुम्ही घरबसल्या मोबाइलवर देखील पाहू शकता. यासाठी तुमच्या मोबाइलवरुन एक एसएमएस पाठवण्याची गरज आहे. यानंतर काही मिनिटातच तुम्हाला आजचे पेट्रोल डिझेलचे दर कळू शकणार आहेत. तुमच्या मोबाइलमध्ये जा आणि  इंडियन ऑइल (IOC) ग्राहक SP<डीलर कोड> 9224992249 या क्रमांकावर पाठवा. दुसरीकडे HPCL (HPCL) ग्राहकांनी  HPPRICE <डीलर कोड> 922201122 या क्रमांकावर पाठवा. तर BPCL ग्राहक  RSP<डीलर कोड> 9223112222 या क्रमांकावर पाठवू शकतात.