मुंबई: राज्यातील सर्वात मोठी बातमी येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय दिला आहे. 11 जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या गाइडलाइन्सनुसार आता रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार आहेत. शनिवार रविवारी मात्र विकेण्ड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नियम वेगळे ठेवण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत दुकानं सुरू राहणार आहेत. तर रविवारी पूर्ण बंद राहणार असल्याचा निर्णय देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करणार नाही. असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.


कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही, त्यामुळे लोकलचा निर्णय एवढ्यात घेता येणार नाही. तर ज्या ठिकाणी कोरोना कमी झाला, तिथे दुकानं रात्री ८ पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी दिली आहे. 


या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नव्या नियमावलीनुसार वेळेत वाढ करुन दिली आहे. यानुसार आता सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं सुरु ठेवता येणार आहेत. आम्हाला व्यावसायासाठी वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी अनेकदा करण्यात आली होती. ही मागणी आता मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात आनंदाचं वातावरण आहे.


कोणत्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार?


कोल्हापूर
सांगली
सातारा
पुणे
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
सोलापूर
अहमदनगर
बीड
रायगड
पालघर