मुख्यमंत्र्यांच्या हस्ते `फ्युनिक्युलर ट्रॉली` प्रकल्पाचे आज लोकार्पण
`फ्युनिक्युलर ट्रॉली`प्रकल्पामुळे हजारो वृध्द, अपंग भाविक सोमवार पासून देवी मंदीरापर्यंत सहजतेने पोहचून आदिमाया सप्तश्रृंगी चरणी नतमस्तक होवू शकणार आहे.
वणी: देशातील पहिल्या 'फ्युनिक्युलर ट्रॉली' प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यास अखेर मुहूर्त मिळाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वणीच्या सप्तश्रृंगगडावरील 'फ्युनिक्युलर ट्रॉली' चे लोकार्पण आज (२ जुलै) संपन्न होत आहे. यामुळे हजारो वृध्द, अपंग भाविक सोमवार पासून देवी मंदीरापर्यंत सहजतेने पोहचून आदिमाया सप्तश्रृंगी चरणी नतमस्तक होवू शकणार आहे.
प्रदीर्घ काळापासून लोकार्पण लांबणीवर
२००९ मध्ये आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असलेले छगन भुजबळ यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ झाल्यानंतर नऊ वर्षानी आज ट्रॉलीचे उदघाटन होत आहे. गेल्या सहा महीन्यांपासून तांत्रिक कारणे, विविध विभागाच्या परवानग्या, मुख्यमंत्र्यांचे संभाव्य दौरे रद्द होणे, आचार संहिता अशा या ना त्या कारणांमुळे 'फनिक्युलर ट्रॉलीचा' लोकार्पण सोहळा लांबणीवर पडला होता.
असंख्य भाविकांना फायदा
'फ्युनिक्युलर ट्रॉली'मुळे हजारो वृध्द, अपंग भाविक सोमवार पासून देवी मंदीरापर्यंत सहजतेने पोहचून आदिमाया सप्तश्रृंगी चरणी नतमस्तक होवू शकणार आहे.