पंढरपूर : पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन हे आता टोकन पद्धतीने सुरु करणार असल्याची घोषणा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बालाजी दर्शनच्या धर्तीवर हे टोकण दर्शन होणार आहे. या दर्शनासाठी टोकन मिळण्याची व्यवस्था एसटी स्टॅन्ड, तुकाराम भवन, दर्शन रांग, रेल्वे स्टेशन, काळा  मारुती अशा विविधता सहा भागांतून करण्यात आलीय. 


हे दर्शन देताना यात्रेची वेळ सोडून दररोज होणाऱ्या दर्शनाला फायदा होणार आहे. यामध्ये दोन दोन तासांचे टप्पे असणार आहेत. टोकन पद्धतीमुळे दोन तासात दर्शन आटोपून वारकरी परतीला लागणार आहे. कार्तिक वारीपासून प्रायोगिक तत्वावर ही पद्धत सुरु करण्यात येणार आहे.