कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी परतीच्या मार्गावरही टोलमाफी मिळणार आहे. १ ते ४ सप्टेंबर अशी चार दिवस टोलमाफी मिळणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी परतीच्या मार्गावरही टोलमाफी मिळणार आहे. १ ते ४ सप्टेंबर अशी चार दिवस टोलमाफी मिळणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
कोकणात जाणाऱ्या हलक्या वाहनांना टोलमाफी करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. गणेशभक्तांना २२ ते २४ ऑगस्ट दरम्यान ही टोलमाफी देण्यात आलीय. तसेच १ ते ४ सप्टेंबरपर्यंत ही टोलमाफी असणार आहे.
गतवर्षी गणेशोत्सवाच्या तोंडावर टोलमाफी करण्यात आली होती. मात्र, यावर्षी टोलमाफीचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. या टोल माफीसाठी आरटीओ आणि पोलीस स्टेशनमधून स्टीकर घ्यावे लागणार आहेत.