नवी मुंबई : सध्या भाज्यांचा दरात अचानक वाढ झालेली दिसून येत आहे. कोथंबीरची जुडी ५० रुपयांपर्यंत पोहोचली असताना आता टॉमेटोचा भाव वधारला आहे. किरकोळ बाजारपेठेत ६० ते ७० रुपये किलो दराने विक्री होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घाऊक बाजारात टॉमेटो ५० रुपये किलो दराने घेतला जात आहे. टॉमेटोचे पीक संपल्याने ही दरवाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात टॉमेटोचा दर ३० ते ४० रुपये  होता.


सध्या राज्यातून  सांगली, सातारा आणि संगमनेरमधून टोमॅटो  मुंबई मार्केट मध्ये येत आहे. नवीन पीक घेण्यात आले आहे. मात्र, ते तयार नसल्याने टॉमेटोचा तूटवडा जाणवत आहे. त्यामुळे टोमॅटो कमी असल्याने तो महाग झाल्या.