मुंबई : आता रेशन धान्य दुकानांवरही तूर डाळ उपलब्ध होणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षी राज्यात अतिरिक्त तुरीचं उत्पादन झालं होतं. त्यामुळे नाफेड बरोबर राज्य सरकारनंही २६ लाख क्विंटल तूर विकत घेतली होती. तूर विकत घेताना राज्य सरकारची चांगलीच तारांबळ उडाली होती.


दरम्यान, २६ लाख क्विटंल तूरडाळपैंकी भुसा आणि टरफलं वगळून प्रत्यक्षात १७ ते १८ लाख क्विंटल तूर उपलब्ध होणार आहे. यापैंकी ७ लाख क्विंटल तूर ही राज्याच्या विविध पोषण आहारांतून वितरित केली जाईल. तर उर्वरित सुमारे १० लाख क्विंटल तूर रेशन धान्य दुकानांवर उपलब्ध होणार आहे. 


ही तूर बाजारात मिळणाऱ्या भावापेक्षा कमी दरानं म्हणजे ५५ रुपये किलो दराने उपलब्ध होणार आहे.