लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी
लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी
लोणावळा : पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पर्यटन नगरी लोणावळ्यात शनिवारी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. राजमाची पॉईंट, अमृतांजन पॉईंट, भुशी धरण तसेच लायन्स आणि टायगर्स पॉईंट ही पर्यटन स्थळं पर्यटकांनी फुलून गेली आहेत. पावसाळा सुरू झाला की लोणावळ्यात प्रत्येक वीकेंडला पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही नेहमीच वाढत असते. त्यामुळे आज सकाळपासूनच लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते आहे.
वाहत्या धबधब्यात भिजण्याचा तसेच धुक्यात हरवून जात निसर्गाच्या सुंदरतेचा आनंद लुटताना पर्यटक दिसत आहेत. तर दुसरीकडे भुशी धरण अद्यापी भरले नसले तरीही त्याठिकानाबाबत पर्यटकांमध्ये असलेले आकर्षण क्षणाक्षणाला जाणवत आहे. मात्र त्यांची निराशाही लपून राहात नव्हती.