सलग सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटकांची गर्दी
सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणात हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झालेत. कोकणातल्या गणपतीपुळे, गुहागर, दापोली या सर्वच समुद्र किनारी पर्यटक मोठ्या संख्येने आल्याने कोकण हाऊसफुल्ल झालंय. कोकणी खाद्य, निसर्ग यांच्या साथीने नातळच्या सुट्टीसाठी आणि नव वर्षाच्या स्वागताकरीता पर्यटकांनी यावेळी खास कोकणची निवड केल्याचं पहायला मिळतंय...
प्रणव पोळेकर झी मीडिया रत्नागिरी : सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणात हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झालेत. कोकणातल्या गणपतीपुळे, गुहागर, दापोली या सर्वच समुद्र किनारी पर्यटक मोठ्या संख्येने आल्याने कोकण हाऊसफुल्ल झालंय. कोकणी खाद्य, निसर्ग यांच्या साथीने नातळच्या सुट्टीसाठी आणि नव वर्षाच्या स्वागताकरीता पर्यटकांनी यावेळी खास कोकणची निवड केल्याचं पहायला मिळतंय...
कोकणचं सौंदर्य प्रत्येकाला खुणावतचं... निळाशार समुद्र किनारा आणि इथलं सौदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करतं. त्यामुळेच यावर्षी नववर्षांच स्वागत कोकणात करावं याच बेतानं सध्या कोकण पर्यटकांनी हाऊसफुल झालंय. एमटीडीसीची सर्व रिसॉर्ट आणि हॉटेल्सची आरक्षण जानेवारीच्या पहील्या आठवड्यापर्यंत फुल झालीयत. दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश,मुंबई आणि पुण्यातून कोकणात पर्यटक दाखल झालेत. परदेशी पाहुण्यांनीही समुद्र किना-यांनाच जास्त पसंती दिलीय. त्यामुळेच समुद्र किना-यांवर पर्यटकांनी रेलचेल वाढलीय.
कोकणाला ७२० किलोमीटरचा विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभलाय. निसर्गरम्य हिरवाई पर्य़टकांना खुणावतेय यावर्षी पर्यटकांना कोकणला जास्त पसंती दिलीय. कोकणातील गणपतीपुळे, वेळणेश्वर, तारकर्ली अशा ठिकाणांना पर्यटकांची जास्त पसंती दिलीय. तर सध्या कोकणातले अनेक समुद्रकिनारी पर्यटकांनी फुलून गेलेत. वॉटर स्पोर्ट्स, समुद्रातील मज्जा अशात सध्या अनेक पर्यटक गुंतलेत... समुद्राच्या पाण्यात भिजण्याची मज्जा सुद्धा अनेक पर्यटक घेताना दिसतायत.
बच्चे कंपनी बरोबरच त्यांचे पालकही समुद्रकिना-यावर पाण्यात मस्त बागडताना दिसतायत. रत्नागिरी नजीकच्या गणपतीपुळेच्या मंदिरा समोरील किनाराही पर्यटकांनी फुलून गेलाय. कोकणातील दूर पर्यंत पसरलेले आणि स्वच्छ समुद्र किनारे पर्यटकांना इथ आकर्षित करतात..नाताळ आणि नववर्षासाठी कोकण सध्या हाऊस फुल्ल झालय. यावर्षी पर्य़टकांना कोकणाला जास्त पसंती दिलीय..इथल्या वॉटर स्पोर्टला पर्यटकांची सर्वाधिक पसंती आह.
नाताळ आणि नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी परदेशात तसेच गोव्यात जाण्याचे प्लान आखले जातात. मात्र, यावर्षी पर्य़टकांनी कोकणाला जास्त पसंती दिलीय. परदेशात आणि गोव्यात ज्या सुविधा मिळतायत त्याच सुविधा आता कोकणात देखील मिळत असल्यानं मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणाकडे वळू लागलयेत. त्यामुळे नाताळाची सुट्टीची आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल झालेत.