महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली
महाबळेश्वर : महाबळेश्वर परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावलीय. विकेंडला चिंब पावसाचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी वाढलीय. सकाळपासून महाबळेश्वर, पाचगणी परिसरात सरीवर सरी कोसळत असल्याचे पाहायला मिळालं. महाबळेश्वर दाट धुक्यामध्ये हरवल्याचं दिसून आलं. प्रतापगड, पोलादपूर घाटातही देखील धुके मोठया प्रमाणात पडल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शनिवार-रविवार सलग सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल झालेत. वेण्णा लेक परिसरात भर पावसात बोटिंगचा आनंद लुटताना पर्यटक दिसत आहेत. जोरदार पावसामुळे वेण्णा लेक तलावाच्या पाणी पातळीत झपाटयाने वाढ होताना दिसत आहे.