अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वैराट जंगल सफारी दरम्यान काही पर्यटकांना एका वाघांचे दर्शन झाल्याच एक व्हिडिओ समोर आला आहे. आता दिवाळी नंतर मेळघाटात पर्यटकांची गर्दी वाढत असून अनेक पर्यटकांना वाघांचे दर्शन होत आहे. 
तीन दिवसांपूर्वीच मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील धारगड बोरी जंगलात एकाच वेळीं चार वाघांची पर्यटकांना साईड रायटिंग बघायला मिळाली होती. एकाच वेळी चार वाघ दिसल्याने पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या दिवाळी नंतर आता मेळघाट मध्ये पर्यटकांची गर्दी हळुहळू वाढू लागली आहे. त्यात अनेक प्राणी प्रेमी पर्यटक हे वैराट जंगल सफारी ला प्राधान्य देतात अशातच काल काही पर्यटक हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वैराट जंगल सफारी करत असताना त्यांच्या नजरेस एका दिसला यावेळी त्या पर्यटकांनी वाघाचा रूबाब आपल्या मोबाईल मध्ये कैद केला.


मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शेकडो विविध प्रजातीचे प्राणी आहे. पंरतु नेहमी या व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची वर्दळ असते. यामुळे हे प्राणी मुक्तसंचार करताना क्वचितच पाहायला मिळतात. पण सध्या कोरोनामुळे पर्यटकांची संख्या कमी आहे. त्यामुळे वन्यजीव मुक्त संचार करत आहे.



 


महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प


२२ फेब्रुवारी १९७४ साली भारतात एकूण ९ अभयारण्यांना व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. यात मेळघाटचा समावेश होता. मेळघाटच्या निसर्गरम्य वातावरणातील वाघ पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक दरवर्षी येथे येतात. या व्याघ्र प्रकल्पात एकूण 35 वाघांचा संचार आहे. ६ मे व ७ मे रोजी मेळघाटमध्ये प्राण्यांची गणना करण्यात आली. त्यानुसार, मेळघाटात १७ हजार १८५ प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. यात ३५ वाघांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ४० बिबटे, ३४० अस्वल, १७२ रानकुत्रे, तर ७५२ गवे आढळून आले आहेत.