सोलापूर : कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक द चेनअंतर्गत राज्यात निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनवर भर देण्यात आला आहे. मात्र, या लॉकडाऊनचा अनेकांना फटका बसला आहे. आता तर सोलापुरात लॉकडाऊनच्या विरोधात व्यापाऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर व्यापाऱ्यांनी उपोषण पुकारले आहे. (Traders fast against lockdown in Solapur )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यापारी मृत्यूशय्येवर आहे, हे दाखवण्यासाठी एका व्यापाऱ्याला प्रतिकात्मकरित्या सलाईन लावून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला जात आहे. सोलापूर शहरात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असताना देखील केवळ नियमांमुळे प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये कोणतेही शिथिलता दिलेली नाही, असे येथील व्यापाऱ्यांचा आरोप आहे. 


2011 च्या जणगणेनुसार सोलापूर शहराची लोखसंख्या ही 10 लाखाहून कमी आहे. त्यामुळे पालिकेले स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार नाही, असा दावा करत पालिकेने ग्रामीण भागातील आदेशच शहरात लागू केलेत. वास्तविकत: सोलापूर शहराची लोकसंख्या सध्या 10 लाखाहून अधिक आहे. तसेच शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा केवळ 2 ते 3 टक्के आहे. तसेच शहरात 55 टक्के ऑक्सिजन बेड देखील शिल्लक आहेत. त्यामुळे पालिकेने स्वतंत्र निर्णय काढून शहरातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. आम्हाला व्यापार सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.