पुणे : पुण्यात पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. शहर तसंच परिसरात रात्रीपासून संततधार सुरु आहे. विशेष म्हणजे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात संततधार सुरू आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या ४ धरणांपैकी टेमघर वगळता इतर धरणं १०० टक्के भरली आहेत. त्यामुळे या धरणातू पाणी विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरणातून १८,४९१ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मुठा नदीत पूरसदृष स्थिती आहे. नदीपात्रातील रस्त्यावरील वाहतूक रात्रीपासूनच बंद करण्यात आली आहे. पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या ४ धरणांत मिळून ९५ % पाणीसाठा झालाय. गेल्या वर्षी आजच्या तारखेला तो ८५ % इतका होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पाऊस सुरु झाला की पुण्यातील वाहतूकीची अक्षरश: दैना उडते. सर्वत्र वाहतूक कोंडी होते. आजही पुणेकर वाहतूक कोंडीत अडकले आहेत. धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं नदीपात्रातील रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी इतर रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाली आहे. अगदी गल्ली बोळ देखील तुंबले आहेत. त्यामुळे पुणेकरांचं आजचं वेळापत्रक कोलमडलं आहे. लोक ऑफिसात किंवा कामावर वेळेत पोहोचू शकलेले नाहीत. पाऊस असल्यानं दुचाकी ऐवजी चारचाकींची संख्या वाढली आहे. त्यानं वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली.