रायगड : थर्टी फर्स्टचं काऊंडडाऊन सुरु झालंय. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणाच्या दिशेने निघालेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतायत. 


मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेण-वडखडजवळ वाहनांची गर्दी दिसून येतेय. सातशे ते आठशे मीटरच्या लांब रांगा असल्या तरी वाहतूक धीम्या गतीने पुढे सरकत आहे. सध्या तरी या ठिकाणी कोणतीही वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत नाही. 


अवजड वाहनांची वाहतूक बंद केल्यानं पर्यटकांना मोठा दिलासा मिळालाय. विकेंड आणि थर्टी फर्स्ट लागून आल्याने सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडलेत.