रायगड : Traffic jam on Mumbai-Pune Expressway : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. विकेंडला मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वर वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे खालापूर टोलनाक्यावर वाहनाच्या रांगा दिसून येत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वर वाहतुकीची कोंडी झाली आहे. खालापूर टोल नाक्यावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या दोन तर मुंबईकडे जाणाऱ्या तीन लेन सुरु आहेत. 


विकेंडमुळे वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे बोरघाटातही वाहतूक कोंडी झाली आहे. खालापूर टोल नाक्याच्या पुढे पाली मार्गे मुंबई - गोवा महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावरदेखील वाहानाच्या रांगा दिसून येत आहे. त्यामुळे प्रवास करताना आधी ट्राफीक पाहून प्रवासाला निघा.