प्रवीण पोळेकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस अधिक्षक कार्यालयापासून काही किलोमीटरवर 28 मार्च दरम्यान झालेल्या बैलांच्या "कोकण किंग" या अनधिकृत झुंज स्पर्धेदरम्यान वेंगुर्ले तालुक्यातील बाबू नावाच्या देखण्या बैलाचा दुर्दैवी अंत झाला. या स्पर्धेत कुडाळचा अर्जून नावाचा बैल विजयी ठरला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्पर्धेला झालेली तुफान गर्दी आणि बैलांच्या झुंजीवर बंदी असताना देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकांच्या तुडुंब गर्दीत चाललेली स्पर्धा पोलीस प्रशासनाचा नजरेआड कशी राहिली?  या अनधिकृत स्पर्धेमध्ये अतिशय देखण्या आणि नावाजलेल्या "बाबू" या बैलाच्या झालेला मृत्यूला जबाबदार कोण? असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत.


या झुंजीत बाबू नावाचा बैल रक्तबंबाळ झाला. पण यानंतरही झुंज थांबवण्याऐवजी बघ्यांची केवळ हुल्लडबाजी सुरु होती. 



या सर्वांवर कारवाई होणार का? या मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार या सर्वांना कोणी दिला? पोलीस अधीक्षक या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देतील का? असा सवाल आता प्राणिमित्रातून उपस्थित केला जात आहे. 


28 मार्चला मालवण तालुक्यातील एका गावामध्ये झालेल्या या स्पर्धेदरम्यान घडलेला हा प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला. एका अनधिकृत स्पर्धेमुळे बैलाचा मात्र नाहक बळी गेला.