Vishwas Nangare Patil & IPS Officer Transfer : या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ( IPS Officers ) बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारकडून (Maharashtra Government) राज्यातील बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर काही अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. या बदलीच्या यादीत विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) सदानंद दाते (Sadanand Date) यांचीहा समावेश आहे. (maharashtra government) (transfer of senior police officers in maharashtra eknath shinde devendra fadnavis governments big decision)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बदली आणि पदोन्नतीबाबत शासन आदेश जारी केले गेले आहेत. विश्वास नांगरे पाटील यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या  (Anti Corruption Bureau) अप्पर महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. विश्वास नांगरे पाटील हे आतापर्यंत मुंबई सहपोलीस आयुक्त पदावर होते. तर मिरा भाईंदरचे पोलीस आयुक्त असलेले सदानंद दाते यांची बदली ही राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या (Anti-Terrorism Squad) अप्पर पोलीस महासंचालकपदी करण्यात आली आहे.


अमिताभ गुप्तांची पुणे आयुक्तपदावरून बदली झालीय. ते आता अमिताभ गुप्ता कायदा सुव्यवस्थेचे अप्पर पोलीस महासंचालक असणार आहेत.  तर रितेश कुमार हे पुण्याचे नवे पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सांभळणार आहेत. विनय कुमार चौबे हे पिंपरी-चिंचवड आणि मिलिंद भारंबे नवी मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असतील. तर अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांची मुंबईत बदली झाली आहे.