Mumbai-Goa Highway Block : मुंबई-गोवा महामार्गावर 11 जुलै ते 13 जुलै असा तीन दिवस मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात आला होता. आता पुन्हा एकदा या मार्गावर दोन दिवसांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या दोन दिवसांच्या कळात जर तु्म्ही मुंबई-गोवा महामार्गावरुन (Mumbai-Goa Highway) प्रवास करणार असाल तर आधीच नियोजन करुन ठेवा. गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे 19 आणि 20 जुलै असे दोन दिवस मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक काही काळासाठी बंद राहाणार आहे. या काळात कोलाडजवळील म्हैसदरा नदी पुलावर नवीन पुलासाठी गर्डर टाकण्याचं काम केलं जाणार आहे. 19 आणि 20 जुलै या दोन दिवस मुंबई ते गोवा महामार्गावर दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत वाहतू बंद राहाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणार
मेगा ब्लॉकच्या कालावधीत कोकणात येणारी वाहूतक वाकण, पाली माणगाव मार्गे वळवण्यात येणार आहे. तर मुंबई कडे जाणारी वाहतूक कोलाड, रोहा, भिसेखिंड नागोठणे मार्गे वळवली जाणार आहे. राज्याच्या वाहतूक पोलीस विभागाने तशी अधिसूचना काढली आहे. म्हैसदरा नदी पुलावर पाच गर्डर टाकले जाणार आहेत. 


मुंबई-गोवा महामार्गाचं काम
मुंबई-गोवा महामार्गावचं चौपदरीकरण हा विषय गेल्या काही वर्षा संशोधनाचा झाला आहे. गेल्या 12 वर्षात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम रडतखडत सुरु आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकवेळा आंदोलनंही झाली पण अद्यापही महामार्गाचा प्रश्न रेंगाळलं आहे. त्यातच आता या महामार्गावर मेगा ब्लॉक घेतले जाणार आहेत. यामुळे या महामार्गावर प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होणार आहे.