नवी मुंबई : Cutting Tree For Fly Over in Navi Mumbai : उड्डाणपुलासाठी वाशीच्या मध्यवर्ती भागातील 391 झाडांच्या तोडीचा (Tree Cutting) प्रस्तावामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने आली आहे. त्याचवेळी  राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही बाजूने कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वृक्षतोडी विरोधात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकाच वेळी लॉंग मार्चसह चिपको आंदोलन केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबई भाजपाच्यावतीने  जागतिक पर्यावरण दिनी भाजप आमदार  गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली  जन जागृती लॉन्ग मार्च काढण्यात आला. यात नवी मुंबईवर सुरु असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यात आली.  शहरात हजारो झाडांच्या कत्तलीचा घाट घालण्यात आला आहे, असा आरोप भाजपने केला आहे. त्याविरोधात आज  आंदोलन करण्यात येणार येत आहे. पर्यावरण दिनानिमित्त भाजप कडून  ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात  येत आहे. या आंदोलनाची सुरुवात  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐरोली येथील डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन  आणि वृक्षारोपण करुन करण्यात आली.


दरम्यान, या वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज चिपको आंदोल केले जाणार आहे. जितेंद्र आव्हाड या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत. तर भाजपने गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली ‘झाडे वाचवा, लुटारुंना परत पाठवा’ या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे  मुंबईतील आरे जंगल वाचवणारे मुख्यमंत्री आणि पर्यावरणमंत्री नवी मुंबईतील प्रस्तावित वृक्ष कत्तलीबाबत काय भूमिका घेतात, याकडे सा-यांच लक्ष लागले आहे.


दरम्यान यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपाकडून विरोध होत आहे. अरेंजा कॉर्नर ते कोपरी उड्डाणपूलापर्यंत एक नवा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे, यासाठी राज्य सरकार 350 कोटी खर्च करणार असल्याची माहिती आहे.