मुंबई : (Aaditya Thackeray On Supreme Court Hearing) महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या शिंदे गट (Eknath Shinde Group) विरूद्ध ठाकरे गट प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये कोर्टाने शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे (Election Commission) निर्णय सोपवला आहे. (Maharashtra Political Crisis) ठाकरे गटासाठी हा निर्णय धक्का असल्याचं बोललं जात आहे. मात्र अशातच आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.  (Trending Aaditya Thackeray On Supreme Court Hearing Maharashtra Political Crisis) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मी काही ठिकाणी बघत होतो कोणत्या गटाला दिलासा कोणत्या गटाला धक्का मात्र कोणाला दिलासा नाही तर युक्तिवादाचे कोर्ट बदललं आहे. जे सुप्रीम कोर्टात होतं ते आता निवडणूक आयोगाकडे गेला आहे तिथे युक्तिवाद सुरू राहील, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. 


जे काय होत आहे ते जनतेच्या समोर आहे महाराष्ट्रातील जनता जगातील जनता बघत आहे हा युक्तिवाद देशातील लोकशाहीसाठी महत्त्वाचा राहील. आम्ही सत्तेच्या बाजूने आहोत सत्य आमच्या बाजूने राहील आम्ही सत्याच्या सोबत उभे आहोत विजया दशमीला जसा सत्याचा विजय झाला तसा आमचा देखील विजय होईल, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. 


दुसरीकडे कोर्टाच्या या निर्णयावर शिंदे गटामध्ये सेलिब्रेशन करण्यात आलं. यावर आदित्य ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया देताना शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला आहे. कोणाचा विजय होतो तेव्हा असं वाटतं की कोणाला धक्का बसलाय जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले तेव्हा देखील आपण बघितलं होतं टेबलावर चढून डान्स करत होते तर त्यांच्याकडून वेगळं काही अपेक्षित नसल्याचं ठाकरे म्हणाले.