Nitin Gadkari Visit Pune Chandani Chowk : पुण्यातील कायम वाहतूक कोंडी असणारा चांदणी चौकातील पूल दोन दिवसात जमीनदोस्त होणार आहे. पुलाला स्फोटके लावून पाडलं जाणार असून टीम काम करत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पाडकामाअगोदर चांदणी चौकाचं निरीक्षण केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीन गडकरी यांचा हेलिकॉप्टरमधून निरीक्षण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचं काम 8 दिवसांमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना गडकरींनी दिल्याची माहिती आहे. 


पूल पाडत असताना 200 मीटर परिसर निर्मनुष्य केला जाणार आहे. तिथला सर्वे केला असून जवळपास ज्या इमारती आहेत त्यांना नोटीस उद्या पाठवल्या जाणार आहेत. पोलिसांकडून ब्लास्टिंगची परवानगी घेतली असल्याचं राजेश देशमुख यांनी सांगितलं. 600 किलो स्फोटके यासाठी वापरली जाणार आहेत. 



1 ऑक्टोबरला रात्री एक वाजता पासून 2 ऑक्टोबरला सकाळी आठ वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. पूल पाडल्यानंतर राडारोडा काढण्याचं काम होणार आहे. त्यामुळे साताराहून मुंबईला जाणाऱ्या वाहनांच्या नियोजनासाठी पिंपरी चिंचवड, पुणे आणि पुणे ग्रामीण दलाचे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. 


दरम्यान, मुंबईहून साताऱ्याकडे आणि साताऱ्याहून मुंबईकडे येणं प्रवाशांनी टाळावं असं आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आलंय. मुंबईतीलट ट्विन टॉवर पाडण्यासाठी जी टीम होती त्याच टीमकडे हे काम सोपवण्यात आलं आहे.