जुन्नर :  पुणे -नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ त्र्यंबकेश्वर-पुणे एसटी आणि टेम्पोचा यांच्या भीषण अपघात झाला. या अपघातात ९ जण जागीच ठार झालेत. तर १५ जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला.  जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एस. टी आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा अपघात झाला. हाती आलेल्या माहितीनुसार, कांद्याने भरलेल्या टेम्पो रस्ताच्या कडेला टायर बदलण्यासाठी उभा करण्यात आला होता. दरम्यान, मुसळधार पाऊस कोसळत होता. यामुळे एस.टी चालकाला समोरील टेम्पो दिसला नाही आणि एस टी सरळ टेम्पोला धडली. या अपघात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत.



त्र्यंबकेश्वर -पुणे या एसटीतील ७ प्रवशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. टेम्पोचे चाक बदलणाऱ्या दोघांचा एसटीच्या धडकेत मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृत्युंचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.