नाशिक : नाशिक महापालिकेत सध्या बदल्यांचा धडका सुरू आहे. धडकेबाज आयुक्त तुकाराम मुंढेंनी आज मनपाला २२ अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या केल्यात. याशिवाय वैद्यकीय विभागातील ८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहे. प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आलाय. याशिवाय  राजकीय दबाव सहन केला जाणार नाही, असंही मुंढेंनी स्पष्ट केलंय..