तुकाराम मुंढे आज थेट नागरिकांमध्येच जाऊन पोहोचले
मुंढे यांच्या आईची तब्येत बिघडल्याने कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.
नाशिक : नाशिकमध्ये मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या 'वॉक विथ कमिशनर' या कार्यक्रमाला अखेर सुरुवात झाली आहे. 21 एप्रिलला मुंढे यांच्या आईची तब्येत बिघडल्याने कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. पूर्वसुचनेसह तक्रार करणाऱ्या नागरीकांशी थेट संवाद साधत सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी आयुक्त मुंढे हजर झाले होते. आयुक्त मुंढे ऑनलाईन तक्रार निवारण आणि प्रशासनात शिस्तीवर भर देतात. मात्र थेट नागरिकात जात त्यांनी नाशिककरांच्या समस्या जाणून घेत निवारण करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले. तसंच प्रशासनाबाबत नागरिकांमध्ये जो गैरसमज पसरवला जातो, तो दूर करण्याचा प्रयत्नही केलाय.
या उपक्रमाच्या माध्यमातून नगारिकांना तक्रारी, सूचना तसेच शहराच्या विकासाबाबत संकल्पना मांडण्याची संधी प्राप्त झालीय. मुंढे यांनी अनेक नागरिकांना कायद्याचे धडे दिलेय तर अधिकाऱ्यांना काम न केल्याने विचारणा करण्यात येतेय.
आतापर्यंत 71 तक्रारीचे निवारण करण्यात आलं आहे. या उपक्रमानंतर आयुक्तांशी संवाद साधल्यानंतर नागरिकांनी आयुक्तांच्या उपक्रमाचे स्वागत केलं आहे. तर आपल्या समस्या लवकर सोडवल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.