Turkey Earthquake: नागपूरमधील `या` भविष्यकारानं 4 महिन्यांपूर्वीच केलं होतं तुर्किच्या भूकंपाबाबत भाकीत
turkey syria earthquake 2023 : अमित विभूते हे मूळचे नागपुरचे आहेत. सॉफ्टवेअर क्षेत्राशी निगडित अभ्यास करून सध्या अमित त्यांचा व्यवसाय करतात. पण ज्योतिष्य शास्त्रात असलेल्या रुचीमुळे त्यांनी यावर वाचन सुरू केलं. 2005 पासून अभ्यास सुरु केला. यातून ते अनेकदा भाकीतं फेसबुकवरील आपल्या वॉलवर टाकून व्यक्त होत असतात.
पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर: ज्योतिष शास्त्रनुसार ग्रह आणि परिस्थितीचा अभ्यास करून शेकडो वर्षांपासून भाकीतं मांडली जातात. यापैकी काही भाकीतं खरी ठरतात तर कधी खरी ठरतातच असं नाही. किंबहुना हा मुद्दा वादाचा ठरेलही पण असो. सध्या या भाकीतांसंदर्भात सांगण्यामागील एक कारण म्हणजे नागपुरातील जोतिष्य अभ्यासक अमित विभूते यांनी चार महिन्यांपूर्वीच भूगर्भात हलचाल होऊन मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली होती. नुकत्याच तुर्की आणि सीरियाच्या सीमेवर झालेल्या भूकंपामुळे हजारो लोकांना प्राण गमवावे लागलेत. पण हे भाकीत कसं काय शक्य झालं ते जाणून घेऊन या विशेष वृत्तांतून अमित विभूते यांच्याकडून....
कोण आहेत अमित विभिते?
अमित विभूते हे मूळचे नागपुरचे आहेत. सॉफ्टवेअर क्षेत्राशी निगडित अभ्यास करून सध्या अमित त्यांचा व्यवसाय करतात. पण ज्योतिष्य शास्त्रात असलेल्या रुचीमुळे त्यांनी यावर वाचन सुरू केलं. 2005 पासून अभ्यास सुरु केला. यातून ते अनेकदा भाकीतं फेसबुकवरील आपल्या वॉलवर टाकून व्यक्त होत असतात.
भूकंपाबद्दल काय म्हणाले होते ते?
नुकतीच अमित विभूते यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये भारतातील काही भूभागांमध्ये भूकंपाची शक्यता व्यक्त केली होती. यामध्ये त्यांनी 26 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर तसेच 2 फेब्रुवारी 2023 ते 21 फेब्रुवारी 2023 या दरम्यान पृथ्वीवर भूकंपासारख्या घटना घडतील अशी शक्यता व्यक्त केली होती. अमित यांनी व्यक्त केलेली ही शक्यता काही प्रमाणात खरी ठरली. याच आधारे पुढच्या भागात 4 नोव्हेंबर रोजी त्यांनी तुर्की, इटली आणि ग्रीस या 3 देशांच्या नकाशामध्ये भूभागाजवळ गोल करत, या किंवा या प्रदेशाच्या आजूबाजूच्या परिसरात फेब्रुवारी 2023 मध्ये भूकंपाची शक्यता व्यक्त केली होती. सोमवारी (6 फेब्रुवारी 2023 रोजी) तुर्की आणि सिरीयाच्या सीमा भागांमध्ये भूकंपाचे मोठे धक्के बसले. त्यामुळे अमित विभूते यांनी व्यक्त केलेलं हे भूकंपाचं भाकीत खरं ठरलं आहे, असं आता बोललं जात आहे.
यामागे लोकांचं कल्याण व्हावा हाच हेतू....
अशाप्रकारे भाकित सांगण्यामध्ये उद्देश एवढाच आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडीमुळे लोकांचं फार नुकसान होतं. हे जर मी थांबवू किंवा कमी करू शकलो तर अभ्यासाचा फायदा होईल असंही अमित विभूते सांगतात. माझ्या भाकीतामुळे एकाचा जरी जीव वाचला किंवा जिवितहानी थांबू शकलो तर माझा ज्योतिष अभ्यासाचा उद्देश साध्य होईल. याच सामाजहिताच्या उद्देशाने मी हा अभ्यास करत आल्याचं अमित विभूते बोलून दाखवतात.
हे का घडत आहे?
मानवी जीवनाप्रमाणे पृथ्वीची एक सायकल असते त्यातून पृथ्वीवरील असे वेगवेगळ्या काळात बदल होत असतात. भूकंपाची सुद्धा अशाच पद्धतीची ही शृंखला असून पुढील काळातही अशा पद्धतीच्या घटना होत राहतील. साधारण एप्रिलपर्यंत अशा पद्धतीच्या आणखी घटना घडतील असेही भाकीत अमित विभूते यांनी 'झी 24 तास'शी बोलताना व्यक्त केलं आहे.