अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे :  वयाच्या दहाव्या वर्षी त्याने स्मार्ट फोन हातात घेतला आणि हऴूहऴू त्याला त्याची सवयच लागली... या सवयीचं व्यसनात कधी रुपांतर झालं हे त्यालाही कळलं नाही.. अखेर मोबाईलचं हे व्यसन दूर करण्यासाठी अखेर मानोसोपचार केंद्रात त्याची रवानगी झाली... इंटरनेटच्या मोहजालात अडकलेल्या १८ वर्षांच्या तरुणाचं हे उदाहण... मात्र अशा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. केवळ इंटरनेट नाही तर टीव्ही, मोबाईल आणि लॅपटॉप या सारख्या स्क्रिन्सचं व्यसन ज़डलेल्यांसाठी पुण्यात मनोविकास मानसोपचार केंद्र सुरू करण्यात आलंय. दारु आणि ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांच्या उपचारासाठीच्या व्यसनमुक्ती केंद्रांबाबत आपण ऐकलंय... मात्र, दिवसेंदिवस टीव्ही इंटरनेटचं व्यसन जडणाऱ्यांची संख्या वाढतेय... अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुण्यात मनोविकास मानसोपचार केंद्र सुरु करण्यात आलंय.


स्क्रीनचं व्यसनाची लक्षणं...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- मोबाईलवर सतत गेम खेळणं


- वेबसिरीज किंवा पॉर्न पाहणं


- सतत ऑनलाईन शॉपिंग


- इतरांशी संवाद तुटणं


- सतत एटकं राहणं


- लहान सहान गोष्टींवर मोबाईलवर अवलंबून असणं


- मोबाईल बंद पडल्यास किंवा इंटरनेटचा वेग कमी झाल्यास अस्वस्थ होणं


- प्रसंगी आक्रमक होऊन स्वत:ला इजा करणं


पुण्यात दोन दिवसांपूर्वीच हे केंद्र सुरू झालंय. काही रुग्णांचं समुपदेशन केलं जातं कर काही जणांना औषधं दिली जातात. बदलणाऱ्या काळानुसार अपडेट ठेवण्यासाठी मोबाईल, इंटरनेटचा वापर अपरिहार्य आहे... मात्र त्याची सवय आणि व्यसन यामध्ये पुसटशी सीमारेषा आहे, ही सीमारेषा ओळखायलाच हवी...