रॉयल, ट्विंकल स्टारचा संचालक ओमप्रकाश गोयंका पोलिसांच्या ताब्यात
पुणे: रॉयल आणि ट्विंकल स्टारचा संचालक ओमप्रकाश गोयंका अखेर पुणे पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. गेले अनेक दिवस पुणे पोलिसांना तो हवा होता. दरम्यान, पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. गोयंकाच्या सुमारे ३५०० कोटी रुपयांच्या देशभरातील ९६ मालमत्ता जप्त होणार असून, त्याचीही चौकशी केली जाणार आहे.
थोडक्यात..
रॉयल आणि ट्विंकल स्टारचा संचालक ओमप्रकाश गोयंकावर एमपीडीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. त्याच्या ३५०० कोटी रुपयांच्या ९६ मालमत्ता जप्त करण्याची कारवाई नाशिक ग्रामीण पोलिसांनी सुरू केली आहे. चार जणांच्या तक्रारीवरून गेल्या महिन्यात १९ मेला नाशिक ग्रामीण पोलिसांनी मुंबईतून संचालकाला अटक केली होती. या कारवाईनंतर गोयंकाविरोधात राज्यातील चार हजाराहून अधिक तक्रारी नाशिकला दाखल झल्या आहेत. हॉलिडे रिसॉर्टसाठी डिपॉझिट्स घेऊन अठरा लाख ठेवीदारांची साडे सात कोटींची फसवणूक झाली असल्याचा अंदाज आहे
चार हजाराहून अधिक तक्रारी
नाशिक ग्रामीण पोलिसांनी ओमप्रकाश गोयंकाला अटक केली होती. त्याच्याविरोधात चार हजाराहून अधिक तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या होत्या. अठरा लाख ठेवीदारांची साडे सात कोटींची फसवणूक केल्याचा त्याच्यावर ओरोप आहे.