`आयएसआय`शी संबंधित दोघांना नागपुरातून अटक
या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती
नागपूर : नागपूरच्या भालदारपुरामधून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. सैन्य दलाच्या गुप्तचर यंत्रणा विभागाने ही कारवाई केलीय. हे दोघंही पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती. सैन्य दलाच्या गुप्तचर यंत्रणा विभागातल्या मोजक्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आली होती.
गेल्या महिन्यात नागपुरातून ब्रह्मोस क्षेपणास्त्रासंदर्भातील गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याच्या आरोपाखाली डीआरडीओचा अभियंता निशांत अग्रवाल याला उत्तर प्रदेश एटीएस आणि सैन्यदलाची गुप्तचर यंत्रणेनं नागपुरातून अटक केली होती.