ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेटमधील तरुणीच्या विनयभंग प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीय. यांत रिक्षाचालक आणि त्याच्या मित्राचा समावेश आहे. नौपाडा पोलिसांनी ही कारवाई केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिक्षाचे हप्ते देण्यासाठी या दोघांना पैसे हवे होते. याच पैशांसाठी तरुणीच्या चेनस्नॅचिंगचा या दोघांनी प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तरुणींने आरडाओरड केल्यानं या दोघांनी तिला रिक्षातून फेकून दिलं होतं. 7 जूनला हा विनयभंगाचा प्रकार घडला होता. यासाठी पोलिसांची 4 पथक काम करत होती.


20 ठिकाणचे सीसीटीव्ही तपासून संतोष लोखंडेला अटक केली. तर लुईसवाडी येथून आरोपी चालक लहू घोगरे याला अटक केली. लहू हा रेकॉर्डवरील आरोपी आणि संतोषवर देखील 2 गुन्हे दाखल आहेत. 


तर 8 जूनपासून संतोष लोखंडे बेपत्ता असल्याची तक्रार त्याची पत्नी वागले इस्टेट पोलिसात केली होती. रिक्षा क्रमांक एम एच 04 एफसी 2518 ही जप्त केलीय.