वाशिम : wrong polio dose : एक धक्कादायक आणि चीड आणणारी बातमी. आरोग्य विभागाचा हलर्गजीपणा एका चिमुकीवर बेतला आहे. वाशिममध्ये चुकीचा पोलिओ डोस पाजल्यामुळे दोन महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील निम्बी गावात 8 फेब्रुवारीला बालिकेला डोस दिल्यानंतर मेंदूचे काम करणे बंद झाले. त्यानंतर तात्काळ वाशिमच्या एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार दरम्यान बालिकेचा मृत्यू झाला. डोक्यात ताप शिरल्याने मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे.



कासोळा आरोग्य केंद्रा अंतर्गत निबी गावात लसीकरण सुरु होते. बालिकेला दिलेल्या लसीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप पालक केशव  आडे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. त्यांनी तसी तक्रार  मंगरूळपीर पोलिसात केली आहे. तसेच याबाबतची तक्रार आरोग्य आधिकरी यांच्याकडेही केली आहे. 8 फेब्रुवारी 2022 रोजी बालिकेला  पोलिओ डोस दिला. त्यानंतर त्याच रात्री बालिकेचे मेंदूच काम करणे बंद झाले, असे तक्रारीत म्हटले आहे. मुलीला एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. अधिक उपचारासाठी अकोला इथं हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. उपचार दरम्यान  मृत्यू झाला.  


याबाबत आरोग्य विभागाने बालिकेला दिलेल्या डोसबाबत आपले  स्पष्टीकरण दिले आहे. शासनाने सांगितलेल्या नियमाप्रमाणे लसीकरण करत आहोत. लसीकरण केल्यावर 24 तासात त्याचे परिणाम जाणवतात. मात्र तसे न होता दुसऱ्या दिवशी बालिकेची प्रकृर्ती बिघडली आणि उपचारानंतर बालिका दगावली म्हणून दोष दिला जात आहे. परंतु लस दिल्याने असे काही झालेले नाही, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.