महाड : महाडच्या तळीये दुर्घटनेबरोबर त्याच डोंगर परिसरात आणखीन दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात भुस्खलन झाले आहे. तळीये गावच्या विरुद्ध बाजूला असलेल्या साळुंगण आणि ऊबंर्डे गावात ही मोठ्या प्रमाणत दरड कोसळली आहेत. अक्षरशः डोंगराचा मोठा भाग कोसळून खाली आलाय. अगदी तळीये गावच्या विरुद्ध ठिकणी या दोन मोठ्या दरडी कोसळल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नशीब बलवत्तर म्हणून या दोन्ही दरडी गावा बाहेर कोसळल्या. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर महाडला जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.
 
स्थानिक प्रशासनाक़ून या ठिकाणी शोध आणि मदतकार्य सुरु आहे.


रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी, गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून अनेकांचा मृत्यू झाला आहे.