विकृती! धावत्या एक्स्प्रेसवर ज्वलनशील पदार्थ फेकले; मानमाडमध्ये दोन प्रवासी जखमी
लासलगाव - मनमाड रेल्वे स्थानाकादरम्यान हा प्रकार घडला आहे. धावत्या एक्स्प्रेसमध्ये ज्वलनशील पदार्थ फेकण्यात आले आहेत.
निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना मनमाडमध्ये घडली आहे. लासलगाव - मनमाड रेल्वे स्थानाकादरम्यान( Lasalgaon - Manmad railway station ) हा प्रकार घडला आहे. धावत्या एक्स्प्रेसमध्ये ज्वलनशील पदार्थ(inflammable material) फेकण्यात आले आहेत. या प्रकारात दोन प्रवासी जखमी झाले आहेत. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस - जय नगर पवन एक्सप्रेसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. धावत्या एक्सप्रेसमध्येच ज्वलनशील पदार्थ फेकण्यात आले आहेत. एका माथेफिरूने सहप्रवाशांवर ज्वलनशील पदार्थ फेकले आहेत.
ही रेल्वे मनमाड स्थानकात येताच माथेफिरूला ताब्यात घेतले.
या माथेफिरुला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांवर देखील त्याने ज्वलनशील पदार्थ फेकण्याचा प्रयत्न केला. यात रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन कर्मचाऱ्यांसह मदतीसाठी गेलेल्या खाद्यपदार्थ विक्रेतेही जखमी झालेत. या गदारोळात रेल्वे सुमारे 20 मिनिटे मनमाड स्थानकात उभी होती. रेल्वे सुरक्षा बलाने माथेफिरूला ताब्यात घेतले असून रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग अधिक तपास करीत आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये मोठी दहशत सपरली होती.