Kolhapur Accident News : भरधाव चारचाकी ओढ्यात कोसळून दोघेजण ठार झाले आहेत. कोल्हापुर येथील भुदरगड तालुक्यातील गारगोटी पाटगाव रोडवर हा अपघात झाला आहे. यातील मृत तरुण नविन कार खरेदी करायला जाणार होता. मात्र,  घरात नवीन कार येण्याच्या 2 तास आधीच विपरीत घडलं आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.  


कार थेट ओढ्यात कोसळली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघातात तांबळे अनुप खुर्द येथे राहणारे 22 वर्षीय आदिल कासम शेख आणि जहीर जावेद शेख हे दोन तरुण जागीच ठार झाले आहेत. तर साहिल मुबारक शेख हा तरुण जखमी झाला आहे. गुरुवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास हे तिघेजण आपल्या चार चाकीतून अनफ खुर्द इथून अनफ बुद्रुकच्यायला दिशेने निघाले होते. मात्र, दासेवाडी इथ आल्यावर आदीलचा भरधाव गाडीवरील ताबा सुटून गाडी पलट्या मारत एका पुलावरून ओढ्यात कोसळली. आज सायंकाळी आदिल आपल्या कुटुंबीयांसमवेत कोल्हापूरला नवीन चार चाकी आणण्यासाठी जाणार होता. मात्र, नवीन चार चाकी आणण्यापूर्वीच आदिलसह जहीर याच्यावर काळाने घाला घातला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. ल जखमींना तातडीने कारच्या बाहेर काढण्यात आले. 


डंपरने धडक दिल्याने महिला गंभीर जखमी  


पुणे शहरात सिंहगड रस्त्यावर एक अपघात घडला. या अपघाताचे सीसीटीव्ही समोर आला असून हा अपघात थरारक होता. सिंहगड रोड वर असणाऱ्या रोहन कृतिका सोसायटीच्या समोर एक सिग्नल आहे. हा सिग्नल ओलांडताना डंपरने एका महिलेला धडक दिली. सिग्नल सुटण्याच्या वेळेस महिला झेब्रा क्रॉस वरून जात होती. यावेळी महिला डंपर खाली आले. तरीही डंपर चालकाला महिला दिसली नाही. डंपर पुढे गेल्यानंतर ही महिला जागेवर उठून बसली. व जाणाऱ्या लोकांनी महिलेला रस्त्याच्या बाजूला आणले. ठोंबरे असे या महिलेचे नाव असून तिच्या पायाला दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर बाजूच्या लोकांनी महिलेला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केला आहे. ठोंबरे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या संदर्भात दत्तवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.


मुक्ताईनगर जवळ बसचा अपघात, 9 प्रवासी जखमी


मुक्ताईनगर आगाराची बस आज जळगाव येथून निघून काटेलधामकडे येत होती. दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा-काकोडा गावाजवळ बसचे टायर अचानक फुटले. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस ही बाजूलाच असलेल्या शेताच्या बांधावर जाऊन धडकली. या अपघातामध्ये नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बस मध्ये तब्बल 41 प्रवासी असून चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला आहे. सर्व जखमींना उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असून या रूग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. सुदैवाने या अपघातात प्राणहानी टळली आहे.