पुणे : सोमवार पेठेतील तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. सोमवारी पेठेतील नागझरी नाल्यात शुक्रवारी तीन मृतदेह आढळले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खून करून नाल्यात टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठवण्य़ात आलेत. दरम्यान तीन मृतदेहांपैकी दोघांची ओळख पटली आहे. 


नाविद शेख आणि संदीप अशी दोघांची नावं असल्याचं समोर आलंय. मात्र एकाच ठिकाणी 3 मृतदेह सापडल्याने पुण्यात खळबळ माजलीय.