रत्नागिरी : रत्नागिरीच्या एका पेट्रोल पंपावर एक मोठी दुर्घटना टळलीय. रत्नागिरीत पेट्रोल पंपावर दुचाकीनं पेट घेतला... पण, वेळीच या आगीवर नियंत्रण मिळाल्यानं मोठी दुर्घटना टळली. रत्नागिरीच्या गांधी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून झाल्यावर लगेचच दुचाकीनं पेट घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्यामुळे पेट्रोल पंपावर एकच धावपळ उडाली. पेट्रोल पंपावर आग विझवण्याची साधनं तैनात होती... त्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला... पण त्यामुळे आग विझली नाही.


अखेर अग्निशमन दलाच्या बंबाला बोलवण्यात आलं... त्यानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात आलं... त्यामुळे पेट्रोल पंपावरची मोठी दुर्घटना टळली. 


कशी घडली घटना?


रत्नागिरी शहराच्या मध्यवस्तीत हा थरार अनुभवायला मिळाला. शहरातील माळ नाका इथल्या पेट्रोल पंपातून एका दुचाकीत प्रेट्रोल भरले. पेट्रोल भरल्यानंतर दुचाकी सुरु केली गेली आणि अचानक दुचाकीनं पेट घेतला. शहरातील माळनाका गांधी पेट्रोल पंपामध्ये साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. 


रत्नागिरी अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी आला आणि त्यानं आग आटोक्यात आणली... मात्र तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाली होती. बजाज कंपनीची ही दुचाकी होती. सुदैवाने दुचाकीस्वार वेळीस बाजूला झाल्यानं मोठी दुर्घटना टळली.