Satara News :  सध्या सर्वत्र पावसाची बरसात सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी प्रवाहित झाले आहेत. धबधबे पाहण्यासाठी सर्वच ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. धबधबा पाहण्याचा मोह जीवावर बेतला आहे.  700 फूट दरीत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यात एकीव धबधबा परिसरात ही दुर्घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्यात एकीव धबधब्याच्या कड्यावरून पडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे दोन तरुण या धबधब्याच्या ठिकाणी फिरायला आलेले असताना ते 700 फूट दरीत कोसळले. त्यानंतर या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मेढा पोलीस आणि शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सची टीम तातडीने घटनास्थळी जावून  शोध कार्य सुरू केले. मात्र, पाऊस आणि रात्रीची अंधार यामुळे शोधकार्यात अडथळा येत होता. रात्री उशिरा या दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अक्षय अंबवले,गणेश फडतरे अशी मृत तरुणांची नावे आहेत.


 देवदर्शनाला आलेल्या भाविकांच्या खासगी बसवर अज्ञातांची दगडफेक 


सातारामधील वाई शहरात देवदर्शनाला आलेल्या भाविकांच्या खासगी बसवर अज्ञातांनी दगडफेक केली. दगडफेकीत काही पर्यटक जखमी झालेत. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात अद्यापही तक्रार नोंदवण्यात आली नाही. दरम्यान दगडफेकी का करण्यात आली याच कारण अद्याप अस्पष्ट आहे.


मुलांच्या डोळ्यांदेखत महिला  समुद्रात बेपत्ता झाली


समुद्राला उधाण आलं असताना समुद्रात फोटोशूट करणं एका जोडप्याला चांगलंच महागात पडलंय.. मुंबईतील बँड स्टँडच्या समुद्रातील खडकावर बसून हे जोडपं फोटोशूट करत होतं. तर त्यांचा मुलगा मोबाईलमध्ये त्यांचा व्हिडिओ बनवत होता. मात्र अचानक एक मोठी लाट आली आणि या लाटेत महिला आणि तिचा पती वाहून गेला. पतीला वाचवण्यात यश आलं मात्र महिला मुलांच्या डोळ्यांदेखत समुद्रात बेपत्ता झाली. मुलाच्या मोबाईलमध्ये त्याच्या आईचा मृत्यूचा थरार कैद झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय..ज्योती सोनार असं बेपत्ता महिलेचं नाव आहे.. पती मुकेश आणि तीन मुलांसह ती समुद्रावर फिरण्यासाठी आली होती. मात्र तिचीही पिकनीक शेवटची ठरली.


माळशेज घाटात कलम 144 लागू


माळशेज घाटात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू घाटातील जांभळी धबधबा ओसांडून वाहू लागला आहे. धबधब्यावरती मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी या परिसरात कलम 144 लागू केलं. मात्र कल्याण नगर महामार्गावरून प्रवास करणारे अनेक प्रवासी या धबधब्याचा आनंद घेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली, सावडाव, नापणे यांसारख्या धबधब्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी झालीये. दोडामार्ग इथला मांगेली धबधबा सध्या पर्यटकांच्या पसंतीस उतरतोय. उंचावरून कोसळणा-यचा मांगेली धबधब्याची ही मनमोहक दृश्य पर्यटकांना आक्रषित करत आहेत.