Uday Samant vs Kiran Samant : कोकणात भाऊबंदकी वाद काही नवा नाही. आता मात्र, कोकणच्या राजकारणात भाऊबंदकीचा वाद पहायला मिळत आहे. उदय सामंत विरुद्ध किरण सामंत असा सामना रंगला आहे. या दोघ भावांमधील उफाळून आला आहे. दोघा भावांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. या वादामुळे कोकणातील राजकारण चांगले तापले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरीत सामंत विरुद्ध सामंत असा सामना सुरू झाला आहे. किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी संपर्क कार्यालयावरील बॅनर बदलला आहे. उदय सामंत जनसंपर्क कार्यालय असा बॅनर होता. आता किरण सामंत संपर्क कार्यालय असे बॅनर लावण्यात आला आहे. त्यामुळे किरण सामंत अद्यापही उमेदवारीवरून नाराज असल्याची चर्चा तळ कोकणात सुरू झाली आहे. नव्याने लावण्यात आलेल्या बॅनरवरून उदय सामंत यांचाही फोटो काढण्यात आला आहे. 


रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातला महायुतीचा तिढा सुटला असला तरी नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदनारी देण्यात आलेय. तर शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत निवडणूक लढवणार आहेत.  नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यांत धूमशान रंगणार आहे. 


दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्गतून राणेंना उमेदवारी जाहीर होण्याच्या अगदी काही क्षण आधी.. उदय सामंत आणि किरण सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि माघार घेत असल्याची घोषणा केली.. महायुतीचे उमेदवार नारायण राणेंचा प्रचार करणार.. असं आश्वासन उदय सामंत आणि किरण सामंतांनी पत्रकार परिषदेतून दिलं. किरण सामंतांचा मान राखला जाईल, असं आश्वासन अमित शहांनी दिल्याचं उदय सामंतांनी पत्रकार परिषदेतून सांगितलं.. 


कोण किरण सामंत? विनायक राऊत यांचा सवाल


ठाकरे गटाचे खासदार आणि लोकसभा उमेदवार विनायक राऊत यांनी नारायण राणेंचा चांगलाच समाचार घेतलाय आणि उदय सामंतांना चिमटे काढलेत. नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत कोण किरण सामंत असा उल्लेख करत सामंतांचा अपमान केला होता. त्याचवेळी नारायण राणेंचं जहाज बुडाल्याचं राऊत म्हणालेत. तर तीन वर्षांत कोकणात उद्योग आणणार या राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. तर, राणेंच्या मते उदय सामंत उद्योगमंत्री असून काहीच काम करत नसल्याचा अर्थ निघतो असा चिमटाही राऊतांनी घेतलाय...