सातारा : Satara Municipal Election : सातारा नगरपालिका निवडणूक जवळ आल्यामुळे खासदार उदयनराजे भोसले (Udayanaraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांच्यात आरोप प्रत्यारोप फैरी झडू लागल्या आहेत. दोन्ही राजांमध्ये जुंपल्याने चर्चेचा विषय झाला आहे.  खासदार उदयनराजे हे दिल्लीत असून वेगवेगळ्या मंत्र्यांना ते भेटतायत. यावर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी फेसबुक पोस्ट करून टीका केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीत केंद्राच्या विविध मंत्र्यांना भेटून फोटोसेशन करायचे. निवेदन देऊन शेकडो कोटी निधीचे आकडे पेपरमधून छापून आणायचे. पण, खरंच किती निधी आणला? आणि तुम्ही एवढे मोठे महान विकासपुरुष आहात तर, सातारा लोकसभेला तुमचा पराभव करुन जनतेनं तुम्हाला तुम्ही केलेल्या भरीव विकासाची पोचपावती का दिली, असा खोचक सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलाय.


याला  उदयनराजे भोसले यांनी प्रतिउत्तर देत पत्रक काढले आहे. यात जय किंवा पराजय यालाच निवडणुका म्हणतात. आमचा पराभव आम्ही खुल्या मनाने स्वीकारला आहे. आधी तुमच्या विधानसभेतील पोटनिवडणुकीच्या पराभवाची कारणं द्या. अजिंक्यतारा सहकारी बँक कायदेशीर मर्ज केली होती तर मर्ज करण्यासाठी स्थापन केली होती का? अजिंक्य बाजारचे रेस्टॉरंट केले आणि ते बंद पाडले हाच तुमचा खरा वारसा आहे का, आदी सवाल खासदार उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंना या पत्रकातून विचारले आहेत.