COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Udayanraje Bhosale birthday today : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale ) यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यातल्या गांधी मैदानावर कार्यक्रमाचं आयोजन केलं होते. यावेळी उदयनराजे भोसले यांनी सातारकरांसाठी गाणं गायलं. 'तुम्ही माझ्यावर प्रेम करता त्यांच्यासाठी हे गाणं गायलं' असं सांगत उदयनराजे यांनी मैदानावरील सर्वांची मनं जिंकली.


उदयनराजे यांनी उडवली कॉलर; मी वय सांगणार नाही, विचारलं तर माझ्यासारखा वाईट मीच?


'तेरे बिना जिया जाये ना' हे गाणं उदयनराजे यांनी गायले. माझ्या चाहत्यांसाठी मी हे गाणं गायलं आहे. तुम्ही माझ्यावर प्रेम करता त्याप्रेमापोटी हे गाणं गायलं आहे, असे सांगताच उदयनराजे यांच्या चाहत्यांनी एकच जल्लोष साजरा केला.


आणि उदयनराजे भोसले कॉलर उडवली...


दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशाच एका कार्यक्रमात उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) पुन्हा एकदा कॉलर उडवून चाहत्यांची मनं जिंकली. साताऱ्यातल्या गांधी मैदानात शरीर सौष्ठव स्पर्धा झाली. त्यात उदयनराजे यांनी प्रेक्षकांना अभिवादन केल्यावर कॉलर उडवली. 



उदयनराजे यांनी कॉलर उडवल्यावर त्यांनी अनोखी पोझही दिली. कार्यक्रमाला उदयनराजेंचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. माझं वय मी सांगणार नाही, कोणी विचारलं तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही असा इशाराही त्यांनी दिला.   गांधी मैदान येथे घेतलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत उदयनराजे भोसले यांनी उपस्थिती लावत पुन्हा एकदा कॉलर उडवल्याने याचीच जोरदार चर्चा आहे.