Udayanraje Bhosale : उदयनराजे यांनी पुन्हा उडवली कॉलर; मी वय सांगणार नाही, विचारलं तर माझ्यासारखा वाईट मीच?

Udayanaraje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशाच एका कार्यक्रमात उदयनराजेंनी पुन्हा एकदा कॉलर उडवून चाहत्यांची मनं जिंकली.

Updated: Feb 23, 2023, 03:46 PM IST
Udayanraje Bhosale : उदयनराजे यांनी पुन्हा उडवली कॉलर; मी वय सांगणार नाही, विचारलं तर माझ्यासारखा वाईट मीच? title=

MP Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशाच एका कार्यक्रमात उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) पुन्हा एकदा कॉलर उडवून चाहत्यांची मनं जिंकली. साताऱ्यातल्या गांधी मैदानात शरीर सौष्ठव स्पर्धा झाली. त्यात उदयनराजे यांनी प्रेक्षकांना अभिवादन केल्यावर कॉलर उडवली. कॉलर उडवल्यावर त्यांनी अनोखी पोझही दिली. कार्यक्रमाला उदयनराजेंचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. माझं वय मी सांगणार नाही, कोणी विचारलं तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही असा इशाराही त्यांनी दिला. 

खासदार उदयनराजे यांचा 24 फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा होत असून त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोन दिवस आधीपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन सातारा शहरात करण्यात आले आहे. दरम्यान, गांधी मैदान येथे घेतलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत उदयनराजे भोसले यांनी उपस्थिती लावत पुन्हा एकदा कॉलर उडवून आपल्या चाहत्यांची मने जिंकलीत. 

या कार्यक्रमास अभिनेता अनुप सिंह ठाकुर या आवर्जून उपस्थित राहिला होता. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या केलेल्या मजेशीर भाषणात "माझं वय मी सांगणार नाही आणि कुणी सांगायचा प्रयत्न केला तर याद राखा, असं म्हणत शरीर सौष्ठव स्पर्धेबाबत बोलताना त्यांनी मी जर या ठिकाणी स्पर्धेत पोज मारायला लागलो तर इथ कोण थांबणार नाही, अशी कोपरखळी मारली. या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले यांचा चाहता वर्ग उपस्थित राहिला होता.