Uddhav thackeray Slams Modi Govt: मणिपूरमध्ये होत असलेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे. विरोधकांनी याच मुद्द्यावरून सरकारचा सुर आवळण्यास सुरूवात केलीये. अशातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना देखील खडा सवाल विचारला जातोय. राष्ट्रपती महिला आहेत, काय करत आहेत? मी महामहीम राष्ट्रपतींना विचारु इच्छितो, राष्ट्रपती महोदया तुम्ही ज्या राष्ट्रपती आहेत त्या देशातील महिलांची आब्रू भर रस्त्यावर लुटली जात आहे. आपल्याला काही संवेदना नाहीत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांची ठाकरी तोफ कडाडली. ठाण्यातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिंदे-भाजपवर घणाघात केला. बाळासाहेबांनी ठाण्याला पहिलं नाट्यगृह दिलं, नाटक मात्र वेगळेच लोक करत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं. ठाणे म्हणजे असली शिवसेना असा टोला त्यांनी शिंदे गटाला लावला. तर कमळ फुलवायला भ्रष्टाचाऱ्यांचा मळ लागतो का असा टोला त्यांनी भाजपला लगावला. ठाण्यात उत्तर भारतीय मेळाव्यातून ठाकरेंनी शाब्दिक फटकेबाजी केली. कमळ फुलवण्यासाठी भ्रष्टाचाराचा मळ लागतो का? ठाण्यातल्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात केला. ठाणे म्हणजे असली शिवसेना... बाजारात सध्या चायनीज माल, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटालाही टोला लगावला.


आणखी वाचा - शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या सूचक विधानामुळे चर्चेला उधाण


दरम्यान, मुंबईतल्या चेंबूर विधानसभा विभाग अध्यक्ष प्रमोद शिंदे शेकडो कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर दाखल झाले. या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भागातले शिवसेनेचे नेते आणि माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी काल शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यानंतर सायन आणि चेंबूर विभागातल्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंची भेट घेतली आणि ठाकरेंबरोबर राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.