४० लाख शेतकऱ्यांना मदत मिळाल्याची यादी द्या- उद्धव ठाकरे
ती वाढवून २०१७ करावी अशी मागणी शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय. ते आज औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
औरंगाबाद : राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी जून २०१६ ची तारीख ठरवण्यात आली आहे. ती वाढवून २०१७ करावी अशी मागणी शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय. ते आज औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
गेली दहा वर्ष आम्ही कर्जमाफीसाठी पाठपुरावा करतोय, त्याचा परिणाम म्हणून आज काही प्रमाणात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
दरम्यान ज्या ४० लाख शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. त्या सर्वांची यादी शिवसेनेला द्या, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे सध्या नाशिक, पुणतांबा मार्गे औरंगाबादच्या दौऱ्यावर पोहचले आहेत.