मुंबई : शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ओळखले जाणारे आमदार गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला, आम्हा 54 आमदारांना सोडलं, पण ते शरद पवार यांना सोडायला तयार नाहीत. अशी टीका त्यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुवाहाटीच्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबले आहेत. आमदार गुलाबराव पाटील यांनी दावा केलाय की, 'आपणच उद्या बहुमच चाचणी जिंकणार आहोत आणि सरकार स्थापन करणार आहोत. चिंता करण्याची गरज नाही.'


संजय राऊतांवर टीका


मला पानवाला पानवाला बोलत आहे, पण कधी चुना लावून जाईन हे राऊतांना कळणार नाही असं देखील गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.


'तुमचे बाप किती बोलणाऱ्यांना आमचा जीवन संघर्ष माहित नाही. 1992 च्या दंगलीत तिघे भाऊ आणि आमचा बाप जेलमध्ये होता. त्यावेळी संजय राऊत कुठे होते मला माहित नाही. 56, 302, तडीपार काय असतं हे त्यांना माहित नाही. संजय राऊत यांनी 47 डिग्री तापमानात जळगावमध्ये येऊन 35 लग्न लावावेत मी त्यांना बहाद्दर म्हणून समजून घेईल.' अशी टीका ही त्यांनी केलीये.