मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी ठरली? 3 मोठी नावं धोक्यात
Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली यादी ठरली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Uddhav Thackeray Shiv Sena UBT Candidate List : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election) 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाली असली तरी अजून कुठल्याही पक्षाची यादी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुरु असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena UBT Candidates ) पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची यादी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. (Uddhav Thackeray Shivsena Candidates List Announced For Maharashtra Vidhan Sabha Election 2024 check Details)
कोणाला डच्चू तर कोणाला संधी?
गुरुवारी (17 ऑक्टोबर) मातोश्रीवर उपस्थित असलेल्या 13 विद्यमान आमदारांची उमेदवारांची तसंच आणखी 6 जणांची उमेदवारी निश्चित मानली जातंय, असं सूत्रांनी सांगितलंय. पहिल्या टप्प्यात शिवसेना ठाकरे गटाच्या 19 जणांची उमेदवारी निश्चित झालीय. तर 3 विद्यमान आमदारांना या बैठकीचे निमंत्रण दिले गेले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं त्यांची उमेदवारी थोडी अनिश्चित मानली जातंय.
'या' तीन विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात?
1. अजय चौधरी,शिवडी
2.उदयसिंग राजपूत,कन्नड,संभाजीनगर
3.प्रकाश फातर्पेकर,चेंबूर
पहिली उमेदवार यादी ठरली?
1.आदित्य ठाकरे, वरळी
2.सुनील प्रभू, दिंडोशी
3.रमेश कोरगांवकर, भांडूप
4.सुनील राऊत, विक्रोळी
5.राजन साळवी, राजापूर
6.ऋतुजा लटके, अंधेरी पूर्व
7.संजय पोतनीस, कलिना
8.कैलास पाटील, धाराशीव
9.भास्कर जाधव, गुहागर
10.शंकरराव गडाख, नेवासा
11.वैभव नाईक, कुडाळ
12.नितीन देशमुख, बाळापूर(अकोला)
13.राहुल पाटील, परभणी
यांचीही उमेदवारी जवळपास निश्चित
1. स्नेहल जगताप - महाड मतदारसंघ
2. सुधाकर बडगुजर - नाशिक पश्चिम
3. अद्वय हिरे - मालेगाव बाह्य
4. नितीन सावंत - कर्जत मतदारसंघ
5. अनिल कदम - निफाड
6. मनोहर भोईर - उरण
माजी आमदार राजन तेली आज स्वगृही परतणार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज मोठी इनकमिंग होणार आहे.. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपलाही उद्धव ठाकरे मोठा धक्का देणार आहेत.. भाजपचे राजन तेली हे आज संध्याकाळी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती मशाल घेणार आहेत.. तर सांगोल्यातून राष्ट्रवादीचे दीपक आबा साळुंखेही आज मातोश्रीवर पक्षप्रवेश करणार आहेत.. चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोरेश्वर बोंडवे हेसुद्धा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.