Maharashtra Politics : एकीकडे राज्य विधिमंडळाच्या तीन आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) आजपासून सुरुवात होत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांमध्ये नाराजी नाट्य सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याला कारण आहे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची असलेली नाराजी. बंगुळरुमध्ये (bangalore) देशभरातील विरोधी पक्षांची एकत्र बैठक होत आहे. देशभरातील विविध पक्ष बंगळुरुमध्ये दोन दिवसांच्या बैठकीसाठी एकत्र येत आहे. महाराष्ट्रातूनही ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) तिन्ही पक्ष या विरोध गटामध्ये सामील आहेत. मात्र बंगळुरुमध्ये होणाऱ्या या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केद्र सरकारच्या विरोधात विरोधक एकत्र येत असताना शरद पवार आजच्या बंगुळरुच्या बैठकीस जाणार नसल्याने उदधव ठाकरे नाराज झाल्याची माहिती मिळत आहे. पवार यांनी अचनाक दौरा रद्द केल्याने वेगवेगळ्या तर्क लावले जात आहे. दुसरीकडे पवार यांनी उपस्थितीत राहणे गरजेचे आहे असे मत मांडले जात आहे. दुसरीकडे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट रोजी पुणे येथे टिळक पुरस्कार यासाठी एकत्र येत आहे. त्यातच विरोधकांच्या बैठकीस शरद पवार उपस्थित राहणार नसल्याने नाराजी वाढल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात संजय राऊत यांच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 17 आणि 18 जुलै रोजी बंगळुरू येथे विरोधकांची बैठक होत आहे.  या बैठकीला देशभरातील 24 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे बंगळुरू येथे होणाऱ्या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शरद पवार हे मंगळवारी उपस्थित राहणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे.


"पाटणा बैठकी नंतर आज उदया होणारी बंगळुरू बैठक निर्णायक ठरेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बैठकीस उपस्थित राहतील. शरद पवार बैठकीस उपस्थित राहतील की नाही या बाबत संभ्रम निर्माण झाला होता. शरद पवार उद्या सकाळी बंगळुरू येथील बैठकीस उपस्थित राहतील हे मी खात्रीने सांगत आहे. हम सब एक है!," असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.