राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या गाठीभेटी वाढल्यात. गेल्या पाच वर्षांत एकमेकांना टाळणाऱ्या फडणवीस ठाकरेंच्या वारंवार गाठीभेटी होऊ लागल्यात. आजही आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने ठाकरेंची शिवसेना आणि भाजप युतीबाबतच्या चर्चा सुरू झाल्यात पाहूया त्याबाबतचा हा रिपोर्ट. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महायुतीचं सरकार आल्यापासून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या गाठीभेटी वाढल्यात. गेल्या पाच वर्षांत एकमेकांना टाळणाऱ्या फडणवीस ठाकरेंच्या वारंवार गाठीभेटी होऊ लागल्यात. आजही आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासूनची आदित्य ठाकरेंची ही तिसरी भेट आहे. फडणवीसांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंनी एक सूचक प्रतिक्रिया दिलीय. सत्ताधारी आणि विरोधक एकत्र मिळून चांगलं काम करू शकतात, असं आदित्य यांनी म्हटलंय.


निवडणूक काळात शिवसेना ठाकरे पक्षानं भाजप आणि फडणवीसांवर अत्यंत जहरी टीका केली. उद्धव ठाकरेंनी तर फडणवीसांवर व्यक्तिगत हल्लाबोल केला. मात्र आता आदित्य ठाकरेंना फडणवीसांच्या कौतुकाची घाई झाली की काय, असा प्रश्न पडावा.


उद्धव ठाकरेंची भेट, मुखपत्रातून कौतुक


आधी सामनातून कौतुक, त्यानंतर फडणवीसांसोबतच्या वाढलेल्या गाठीभेटी यामुळे ठाकरे-फडणवीसांमधील जवळीक वाढल्याची चर्चा आहे. सध्या विधानसभेला विरोधी पक्षनेता नाहीय. त्यामुळे या पदावर दावा करण्यासाठीही ठाकरेंकडून लॉबिंग सुरू असल्याचं बोललं जातंय. तसंच निवडणुकीनंतर काहीशा कमजोर झालेल्या महाविकास आघाडी ठाकरे आपली बाजू बळकट करण्याचा प्रयत्न करताहेत. फडणवीसांसोबत जवळीक साधून शरद पवार आणि काँग्रेसला सूचक इशारा देण्याचा प्रयत्न ठाकरे करत नाहीत ना, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.


…तर आम्हीही देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करु


ईव्हीएमचं सरकार की जनतेचं सरकार आहे हा संशय अद्याप आहेच. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तसंच आम्ही विरोधी पक्ष म्हणून जर विषय मांडत असू तर काहीही चुकीचं नाही. आमचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यांच्या भेटी होत होत्या. आमचं एकत्र सरकार असतानाही आम्ही भेटत होतो. जनहिताच्या कामासाठी ज्या भेटीगाठी होतात त्यात गैर काय? असं आदित्य ठाकरे म्हणाले.